सनी लिओनीच्या जाहिरात फलकावरून वाद ;केंद्र सरकारकडे तक्रार दाखल

सण आणि उत्सव भारतीय संस्कृतीचे प्रतिक मानले जातात.या निमित्ताने लोक एकत्र येतात. आणि या संधीचा फायदा व्यावसायिक घेतात व आपल्या प्रोडक्टची जाहिरात करतात. गुजरात मध्ये नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनेक जाहिरातीचे बोर्ड लावले जातात. अशाच एका जाहिरात बोर्डमुळे वादाला सुरुवात झाली आहे.

पॉर्न एक्ट्रेस ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनी लिओनीच्या जगभरात अनेक चाहते आहेत. सनी आणि वाद हे जणू ठरलेल समीकरण आहे. अनेकवेळा सनी नसली तरी तिच्या फोटोमुळे अनेक वाद होतात. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा वादात अडकली आहे.

Loading...

 

सनी लिओनी मॅनफोर्सची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. गुजरातमध्ये काही ठिकाणी मॅनफोर्सकडून सनी लिओनीच्या फोटोसह नवरात्रीच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग लावण्यात आली आहेत. यावर ‘आ नवरात्री अ रामो, परंतु प्रेमथी’ असा संदेश गुजरातीमध्ये लिहिला आहे. ज्याचा अर्थ असा आहे की “या नवरात्रीला खेळा पण प्रेमाने.”जाहिरातीमुळे सांस्कृतिक मूल्यांना धक्का पोहोचवल्याप्रकरणी केंद्र सरकारकडे तिची तक्रार करण्यात आली आहे.

कंडोम ब्रॅण्डच्या या होर्डिंगमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचं हिंदू युवा वाहिनी या संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र चौधरी म्हणाले.
या संघटनेने सनी लिओनीचा फोटो असलेलं होर्डिंग हटवण्याची मागणी केली आहे.  केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनाही तक्रारीचं पत्र लिहिलं आहे.  हे कदापि सहन करणार नाही, होर्डिंग तातडीने हटवले नाही तर निषेध अधिक तीव्र करु. हे भविष्यात पुन्हा घडू नये म्हणून निषेध सुरु आहे, असं नरेंद्र चौधरी यांनी सांगितलं.