निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचार; भाजपच्या कार्यालय, नेत्यांवर हल्ले, ११ जणांचा मृत्यू

bangal

कोलकत्ता : विधानसभा-लोकसभा पोटनिवडणुकांसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशाचं लक्ष्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे.

मात्र आता निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचं दिसून येत आहे. कालपासून सुरु झालेल्या या हिंसाचारामध्ये कालपासून ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. हा हिंसाचार तृणमूल कॉंग्रेसने घडवून आणली असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे. तर याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज बंगालमध्ये जाणार आहेत.

‘ममता दीदींचे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या घरांचे नुकसान करत आहेत. नंदीग्राम येथेही तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली असून, कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला,’ असा दावा भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे.

पश्चिम बंगालची निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली होती. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपला रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्यपालांना निवदेनही सादर केले. पश्चिम बंगालमधील भटपारा येथील घोषपारा रोडवरील भाजप कार्यालय आणि काही दुकानांमध्ये अज्ञातांनी तोडफोड केली. परिसरात बॉम्बही फेकण्यात आले, अशी माहिती मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या