दुध टंचाईची शक्यता, लाखो लिटर दुध टँकरमध्ये अडकले

कोल्हापूर : राज्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत आहे. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोक पुरात अडकले आहेत. तसेच पुराच्या पाण्यामुळे प्रमुख मार्ग बंद आहेत. त्यामुळे दुध वाहतूकही बंद आहे.

सततच्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूक बंद आहे. त्यामुळे गोकूळ दूध संघाचे दुधाचे टँकर भरून जागेवरच थांबले आहेत. याचा मोठा फटका गोकुळला बसला आहे. या टँकमध्ये किमान दहा लाख लिटर दुध शिल्लक असल्याची माहिती आहे. तर साडे पाच लाख लिटर दुध संघात चिलिंग सेंटरला ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, परिस्थिती जर अशीच राहिली तर येणाऱ्या काळात जिल्ह्यात दुध टंचाई निर्माण होऊ शकते. याचा परिणाम सामान्य जनजीवनावर होऊ शकतो. त्यामुळे कोल्हापूरकरांना पुराच्या पाण्यासह दुधाच्या टंचाईचाही सामना करावा लागू शकतो. त्याचा परिणाम जिल्ह्यातील दुधाच्या अर्थकारणावरही होण्याची शक्यता आहे.

या सर्व पूरस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पुर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत अशा सूचना प्रशाष्णाला दिल्या आहेत.

जनतेपेक्षा तुम्हाला प्रचार महत्वाचा; अजितदादांनी टोचले सत्ताधाऱ्यांचे कान

पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करा; मुख्यमंत्र्यांनी दिले प्रशासनाला आदेश

संजय राऊतांची पाकिस्तानात हवा, राज्यसभेतल्या भाषणाची इस्लामाबादमध्ये पोस्टरबाजी