ग्रामपंचायतीत यंदा महिला राज येण्याची शक्यता

औरंगाबाद – सरपंच पदासाठी निवडणुकीनंतर आरक्षण सोडत असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतीत सुमारे सहा हजारांपेक्षा अधिक महिला उमेदवार आहेत.

यावेळेस जिल्ह्यातील एकूण २ हजार ९० प्रभागांतील ५ हजार ६८३ सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतून तब्बल १६ हजार ९५७ जणांनी अर्ज दाखल केले होते. ५ हजार ५४८ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. वैजापूर तालुक्यात १६३०, सिल्लोडमध्ये १५०९, कन्नड १५१२, पैठण १७३२, औरंगाबाद १४४५ तर गंगापूर तालुक्यात १४४८ उमेदवार रिंगणात आहेत.

यंदा ६१७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. एकूण प्रभाग २०९० प्रभाग पूर्ण ग्रामपंचायतींमध्ये आहेत. निवडणुक रिंगणात ११ हजार ४९९ उमेदवार आहेत. जिल्ह्यात २ हजार २६१ मतदान केंद्रे आहेत. वैजापूर तालुक्यात १०५ , सिल्लोड ८३, कन्नड ८३, पैठण ८०, औरंगाबाद ७७, गंगापूर ७१, फुलंब्री ५३, सोयगाव ४०, तर खुलताबाद तालुक्यात 25 ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या