लोणावळ्यातील बिग बॉसचे चित्रीकरण बंद होण्याची शक्यता

bigg-boss-11

लोणावळा : लोणावळ्यात सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ शोच्या चित्रीकरणाचा परवाना रद्द करा, अशी शिफारस लोणावळा नगरपरिषदेतर्फे करण्यात आली आहे. बिग बॉसच्या घरासाठी अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून घरातील सांडपाणी थेट नदीत सोडण्यात येत असल्याचा आरोप बिग बॉसवर करण्यात आला आहे. तीन वर्ष होऊनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. तसेच ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर उभारलेला नाही. त्यामुळे बिग बॉसच्या चित्रीकरणाचा परवाना रद्द करावा, अशी शिफारस लोणावळा नगरपरिषदेच्या चौकशी अहवालात करण्यात आली आहे.Loading…
Loading...