‘बिग बॉस सीझन 13’ मध्ये ‘हे’ सिलेब्रिटीज झळकण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा : टेलीव्हिजन मधील सगळ्यात गाजलेला शो ‘बिग बॉस सीझन 13’ परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मागील सीझन हा जास्त चालला नाही त्यामुळे यावेळेस मेकर्सनी काही तरी वेगळे करण्याचे ठरवले आहे. यावेळेस फक्त सिलेब्रिटीजला एंट्री मिळणार आहे. त्यामुळे सदस्य कोण असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मागील काही दिवसात नवीन सिझनच्या सदस्यांची काही नावे समोर आली आहेत.

यात अभिनेता चंकी पांडे, टेलीव्हिजनची अभिनेत्री पूजा गौर, मेघना मलिक आणि जायरा वसीम हे शो मध्ये येणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतू या वृत्ताला या सेलेब्रिटीजनी अजून दुजोरा दिला नाही . पण टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोंगर आणि पवित्र पुनिया हे शो मध्ये नक्की झळकणार आहेत . बालिका वधू फेम सिद्धार्थ शुक्ला पण दिसू शकतील. बाकी सदस्यांची नावे अजून समोर आली नाहीत.लवकरचं त्यांची नावे देखील समजतील.

यावर्षी बिग बॉसच्या घराचा पत्ता हा लोणावळा नसून मुंबईतील गोरेगाव हा असणार आहे. खर्चात कपात करण्याच्या उदेशाने लोणावळाऐवजी मुंबई मध्ये सेट उभारण्यात येणार आहे. सप्टेंबर मध्ये हा शो सुरु होऊ शकतो अशी माहिती मिळाली आहे. हा भागही सलमान खान होस्ट करणार आहे.