सकारात्मक! लातूरमध्ये आतापर्यंत २ लाख २० हजार २२४ जणांचे झाले लसीकरण

लातूर: जिल्ह्यात तसेच येथील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने येथे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी येथील स्थानिक प्रशासन आवश्यक टे सर्व उपाययोजना करत आहे. तसेच येथे लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे व लोकं देखील लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद देत आहेत. मध्यल्या काही दिवसांमध्ये लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला होता मात्र पुन्हा एकदा गाडी रुळावर आली असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरू झालेले कोविड लसीकरण मोहिमेत आतापर्यंत २ लाख ५८ हजार १८३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात १ लाख २३ हजार ४१६ पुरुषांनी व ९७ हजार २५८ महिलांनी लसीकरण केले आहे. एकूण लसीकरणात पहिला डोस २ लाख २० हजार ७०२ जणांनी, तर दुसरा डोस ३७ हजार ४८१ जणांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्याला कोव्हॅक्सिनपेक्षा कोविशिल्ड लसीचा पुरवठा अधिक झाला आहे. आतापर्यंत २ लाख २० हजार २२४ जणांना कोविशिल्डचा, तर ३७ हजार ९५९ जणांनी कोव्हॅक्सिन लसीचा डोस घेतला असल्याची माहिती शासनाच्या कोविन ॲपवर नमूद आहे.

जिल्ह्यात लसीकरणाला प्रारंभ झाला तेव्हा ४५ वर्षांपुढील विविध आजारग्रस्त, कोरोना काळात फ्रन्टलाईनवर सेवा बजावणारे व ६० वर्षांपुढच्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर १ मेपासून १८ वर्षांपुढील नागरिकांचा समावेश करण्यात आला. टप्प्या-टप्प्याने लसीकरण केंद्रही वाढविण्यात आले. आजघडीला जिल्ह्यात १११ केंद्रांवर लसीकरणाची सोय आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून लसीचा तुटवडा असल्यामुळे मोहीम मंदावली आहे. मात्र लवकरच पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात होईल.

महत्वाच्या बातम्या