धक्कादायक : शाळांमधून सावरकरांचे फोटो काढून टाकण्याचे राज्य सरकारचे आदेश

blank

नवी दिल्ली : कॉंग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सुरूच असल्याचे चित्र आहे. सत्तेची मस्ती असलेल्या राजस्थान सरकारने राज्यातील सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. अशोक गहलोत यांच्या सरकारने सावरकरांचे फोटो काढून टाकण्याचा आदेश देणारे एक पत्रकच शाळांसाठी जारी केले आहे या कृतीमुळे राजस्थान सरकार टीकेचे धनी बनले आहे.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार,सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे फोटो काढून न टाकणाऱ्या शाळांना थेट धमकीच सरकारने दिली असून या आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सरकारने म्हटले आहे.

गहलोत सरकारने सरकारी शाळांमधील उपाध्याय, माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो काढून त्याऐवजी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच सरकारने सावरकर यांचे देखील फोटो काढा असा आदेश दिला आहे.

राजस्थानमध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर सरकारी शाळांमध्ये सावरकर, उपाध्याय, हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र हे सर्व नेते भाजपाचे आदर्श असल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. हे नेते विद्यार्थ्यांसाठी आदर्श नसल्याचेही कॉंग्रेसचे मत आहे. त्यामुळेच हे फोटो काढण्याचे फर्मान राज्यात सत्तेत असणाऱ्या कॉंग्रेस सरकारने जारी केले आहे.