पॉर्नमुळे माझ्या संसाराच वाटोळ झाल; त्यावर बंदी आणा!

मुंबईतील २७ वर्षीय महिलेची सुप्रीम कोर्टात याचिका

मुंबई : मुंबईतील २७ वर्षीय महिलीने पॉर्नोग्राफिक वेबसाईट्स विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका केली आहे. पॉर्नमुळे माझ्या संसाराच वाटोळ झाल असून त्यावर बंदी आणण्याची मागणी सदर महिलेने कोर्टात केली आहे.

भारतातील पॉर्नोग्राफिक वेबसाईट्सवर बंदी आणावी. ‘माझा ३५ वर्षीय पतीला ऑनलाईन पॉर्नोग्राफीची सवय जडली आहे. दिवसातला बराचसा वेळ तो पॉर्न साईट्सवर ब्राऊजिंग करण्यात घालवतो.  तसेच तो माझ्यावर घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकतो आहे त्यामुळे शक्य असेल तेवढ्या लवकर या पॉर्न वेबसाईट्स बंद करा जेणेकरून माझे आयुष्य वाचेल असे या महिलेने म्हटले आहे. माझ्या वैवाहिक आयुष्याची वाट लागली आहे. सुप्रीम कोर्टाने भारतात पॉर्न साईट्सवर बंदी आणावी. अस या महिलेने कोर्टात सांगितले आहे.

पॉर्नोग्राफिक वेबसाईट्समुळे माझ्या पतीच संसाराकडे व माझ्या शारीरिक गरजांकडे लक्ष नाही. उत्साहच नसल्यामुळे दैनंदिन कामंही तो व्यवस्थित करत नाही. आपल्या इच्छेविरोत अनैसर्गिक ओरल सेक्स करण्यासाठी जबरदस्ती करतो. पौरुषत्वाच्या कमतरतेमुळे शारीरिक संबंधांसाठीही तो पुढाकार घेत नाही. त्याच्या अॅबनॉर्मल वागण्यामुळे माझा संसार धुळीला मिळाल आहे’ असा दावा तिने केला आहे.