पॉपकॉर्नच्या किमतीत 3% वाढ

वेबटीम : GST लागू झाल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाला असून नक्की काय महाग झाले आज आणि काय स्वस्त ते अजून ग्राहकांना समजले नाही. मात्र, सिनेमाच्या तिकिटांमध्ये फार काही बदल झाला नसला तरी पॉपकॉर्न च्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने नाकापेक्षा मोती जड अस म्हणण्याची वेळ आली आहे .

GST लागू झाल्यानंतर आलेला हा पहिलाच शुक्रवार

आधी आपण जाणून घेऊयात की चित्रपटाच्या तिकिटांवर GST चा किती परिणाम झाला आहे? आतापर्यंत तिकिटांच्या दरामध्ये राज्यांचा मनोरंजन कर समाविष्ट होता.आता हा कर मोडीत निघाला असून आता फक्त GST च लागू असेल यामुळे काही ठिकाणी तिकिटांचे दर कमी झाले तर काही ठिकाणी फार काही फरक दिसून आलेला नाही.

सिनेमा, पॉपकॉर्न आणि कोल्डड्रिंक्स हे जणू समीकरणच आहे, मात्र आता  जर तुम्ही सिनेमा पहायला जाणार असाल तर थोडा जास्त खिसा रिकामा करावा लागणार आहे कारण GST मुळे 3 टक्के या पदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे श्रीदेवीच्या MOM या चित्रपटसोबतच अनेक चित्रपट आज प्रदर्शित झाले आम्ही जेव्हा सिनेरसिकांशी या विषयी चर्चा केली तेव्हा नाकापेक्षा मोती जड असल्याचे भाव चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते