मुंबई : सीरम इस्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मला धमक्या दिल्या जातायत आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत, त्यांच्या या दाव्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. या धमक्यांमुळेच अदर पुनावाला हा देश सोडून लंडन ला गेले आहेत.
या प्रकरणी अँड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. अदर पुनावाला यांना धमकवणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करावी. तसेच, या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश राज्याचे पोलीस महासंचालक आणि पुणे पोलीस आयुक्त यांना करण्याचे निर्देश द्यावे आणि तातडीनं अदर पुनावाला यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी दत्ता माने यांनी आपल्या याचिकेतून केली होती.
उच्च न्यायालय काय म्हणाले ?
या याचिकेवर आज (२७ मे) रोजी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. पुण्यातील सीरम इंस्टिट्युटच्या अदर पुनावाला यांनी देशासाठी सध्याचा काळात खूप भरीव योगदान दिलंय. संपूर्ण देशासह जगासाठी एक संजीवनी ठरणारी ‘कोविशिल्ड’ ही लस त्यांच्या कंपनीनं तयार केली. त्यामुळे अशा व्यक्तीला जर धमक्या येत असतील तर ते फार गंभीर प्रकरण आहे. याची तातडीनं दखल घ्यायला हवी, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- महाविकास आघाडीचे सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर…; राणेंच्या विधानाने खळबळ
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- …तर काँग्रेसला योग्य तो विचार करावाच लागेल, नितीन राऊत आक्रमक