fbpx

पूनम महाजन यांचे वक्‍तव्‍य बालीश – सुनील तटकरे

टीम महाराष्ट्र देशा – शरद पवार यांचे नेतृत्‍व राष्‍ट्रीय पातळीवर मान्‍य झाले आहे. पूनम महाजन यांचे वक्‍तव्‍य बालीश आणि निंदनीय असून पूनम महाजन यांनी शरद पवार यांची माफी मागावी अशी मागणीही राष्‍ट्रवादीचे राष्‍ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी केली.

अलिबाग येथील शेकाप कार्यालयात पत्रकार परीषद आयोजीत करण्‍यात आली होती. यावेळी तटकरे बोलत होते.

भाजपाच्‍या खासदार पूनम महाजन यांनी शरद पवार यांच्‍या संदर्भात केलेल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याचे राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. राष्‍ट्रवादीचे राष्‍ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी पूनम महाजन यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामा आहेत, तर काँग्रेसने प्रियांकांचे इतके फोटो पसरवले, की ती तैमूर अली असल्यासारखीच वाटत होती, अशी टीका भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा आणि मुंबईतील भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी मुंबईतील सोमय्या मैदानावर आयोजित भाजयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण सभारंभात केली होती.