fbpx

ऐकावं ते नवलचं : पूनम महाजनांच्या संपत्तीमध्ये मोठी घट, १०८ कोटींवरून आली २ कोटींवर

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय जनता पक्षाच्या उत्तर -मध्य मुंबईतील उमेदवार पूनम महाजन यांनी उमेदवारी अर्ज भरताना जाहीर केलेल्या संपत्तीचे आकडे पाहून अनेकांना आश्चर्य वाटू लागले आहे. महाजन यांची गेल्यावेळी मालमत्ता १०८ कोटी रुपये होती. ती केवळ २ कोटी रुपये उरल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

पतीच्या गाडी विक्रीच्या व्यवसायात आलेला तोटा भरून काढण्यासाठी मालमत्ता विकावी लागल्याचे त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. मात्र संपत्तीमध्ये झालेली एवढी मोठी घट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून त्यांच्याकडे असलेली संपत्ती जाहीर केली जात आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवीत असलेल्या भाजप-शिवसेना खासदारांची मालमत्ता सरासरी ३.२० कोटी रुपयांनी म्हणजे ६० टक्क्यांनी वाढली आहे. महाराष्ट्र इलेक्शन वॉच अॉॅड असोसिशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉम्र्स (एडीआर) ने सात मतदारसंघात निवडणूक लढवीत असलेल्या ११६ पैकी ११५ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून निष्कर्ष जाहीर केले आहेत.