fbpx

‘पोरी पटत नसतील तर पळवून आणा’, कदम म्हणाले तेंव्हा पूनम महाजन डोळ्यांवर पट्टी बांधून होत्या का?

टीम महाराष्ट्र देशा – माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना ‘शकुनीमामा’ म्हणणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार मैदानात उतरले आहेत.

गिरीश महाजन, गिरीश बापट आणि राम कदम या भाजप नेत्यांच्या वक्तव्यांची उदाहरणे देऊन, रोहित पवार यांनी पूनम महाजन यांना प्रत्युत्तर दिले आहे. नातू रोहित पवार शरद पवारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याने सोशल मीडियासह सर्वच स्तरातून रोहित पवारांच्या प्रत्युत्तराची सध्या चर्चा सुरु आहे.

पूनम महाजनांना रोहित पवार यांनी काय प्रत्युत्तर दिले?

‘गिरीष महाजन म्हणाले होते,
“दारूच्या ब्रॅण्डला महिलांची नावे द्या मग खप कसा वाढतो ते बघा.”

गिरीष बापट म्हणाले होते,
“तुमच्या मोबाईलमध्ये काय असतं ते माहित आहे, तुम्ही मला म्हातारे समजू नका, या पिकल्या पानाचा देठ अजून हिरवा आहे.”

राम कदम म्हणाले होते,
“पोरी पटत नसतील तर पळवून आणा मी तुमच्या पाठीशी आहे…

आत्ता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे हि विधाने करण्यात आली तेव्हा पूनम महाजन डोळ्यांवर पट्टी बांधून होत्या. आत्ता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहीलं ते आपणच सांगू शकता.’