वांद्रे स्थानकला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या : पूनम महाजन

balasaheb

मुंबई : वांद्रे टर्मिनस स्थानकाचं नाव बदलून शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे टर्मिनस असं नामकरण करण्यात यावं, अशी मागणी भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी केली आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे वांद्र्यात दीर्घकाळ वास्तव्य होते त्यामुळे वांद्रे स्थानकाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पूनम महाजन यांनी केली आहे.

२०१७ मध्ये सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना पूनम महाजन यांनी नामकरणाबाबतचा प्रस्ताव त्यांच्याकडे आणि राज्य सरकारकडे पाठवला होता. पूनम महाजन यांनी या संदर्भात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची नुकतीच भेट घेतली आहे. तसेच महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनाही याबाबत पत्र लिहले आहे.