fbpx

पूनम महाजन रजनिकांतच्या भेटीला

वेबटीम : भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी रविवारी रजनीकांत यांची चेन्नईत भेट घेतली. ही भेट राजकीय नसल्याचे सांगण्यात येत असले तरी रजनीकांत यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा यानिमित्ताने नव्याने रंगू लागली आहे.
भाजयुमोच्या अध्यक्षा आणि खासदार पूनम महाजन सध्या तामिळनाडूत असून रविवारी चेन्नईत पूनम महाजन यांनी रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पूनम महाजन यांनीदेखील ट्विटरवर या भेटीचे फोटो शेअर करताना ‘सर्वात नम्र दाम्पत्याची भेट घेतली’ असे पूनम महाजन यांनी फोटो शेअर करताना म्हटले आहे.पूनम महाजन आणि रजनीकांत यांच्या भेटीने पुन्हा चर्चा रंगली आहे