इंजिन घडय़ाळाच्या ठोक्यावर चालते हे कळले- पूनम महाजन

पुणे- इंजिन घडय़ाळाच्या ठोक्यावर चालते हे कळले, अशी टिप्पणी करत भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार पूनम महाजन यांनी शरद पवार यांच्या मुलाखतीवर शेलक्या शब्दात निशाणा साधला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित युवा संवाद यात्रेच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त कात्रज चौक ते सारसबागदरम्यान संवाद यात्रा काढण्यात आली. त्यानंतर महाजन यांनी ही सूचक टिप्पणी केली.

सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पुनम महाजन यांनी राज ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीसंदर्भातही भाष्य केले. इंजिनदेखील घडयाळ्याच्या ठोक्यावर चालते हे पुण्यातील मुलाखतीवरून दिसून आले, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.

उगाच दुस-यांच्या पक्षात डोकावू नये
विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. त्यातच शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये संवाद नसल्याचे वक्तव्य करून वादाला तोंड फोडले होते. यावर महाजन यांनी पवार यांनाच स्वत:च्या पक्षातील नेत्यांमध्ये संवाद आहे का ? आधी त्याकडे लक्ष द्यावे, उगाच दुस-याच्या पक्षात डोकावू नये, असा सल्लाही दिला.

You might also like
Comments
Loading...