Pooja sawant- पूजा सावंतच्या ‘लपाछपी’चा ट्रेलर रिलीज

अभिनेत्री पूजा सावंत हिच्या आगामी ‘लपाछपी’ या हॉरर सिनेमाचा अफलातून ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. एका सत्य घटनेवरून ही कथा प्रेरित आहे. एका शेतात घडणा-या या सिनेमाचा ट्रेलरच फारच उत्सुकता वाढवणारा आहे. या सिनेमात पूजा सावंत, विक्रम गायकवाड, उषा नाईक आणि अनिल गवस यांच्या मुख्य भूमिका आहेत.

विशाल पुरिया यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तर या सिनेमाची निर्मिती जितेंद्र पाटील आणि अरूणा बी भट यांनी केलीये. आता सर्वसामान्य प्रेक्षकांचा या सिनेमाला प्रतिसाद कसा मिळतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. येत्या 14 जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.