fbpx

गांधीच्या पुतळ्याला गोळी मारल्याचा अजिबात पश्चाताप नाही : पूजा पांडेय

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला स्टंटबाजी करत गांधीजींच्या पुतळ्यावर गोळी मारणाऱ्या हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडेला अलिगड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तिचा पती अशोक पांडेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशभरात यावरून संतापाचीलाट उसळली असताना या दोघांनीही केलेल्या कृत्याचा अजिबात पश्चाताप होत नसल्याचं म्हटलं आहे.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 30 जानेवारीला हिंदू महासभेच्या काही सदस्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये पूजा पांडे या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळी झाडत असल्याचं दिसतं होतं. गोळी मारल्यानंतर पांडेने महासभेच्या सदस्यांना आणि समर्थकांना मिठाईही वाटली.

दरम्यान,अटक केल्यानंतर या दोघांनी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी बोलताना पूजा पांडेय हिने म्हटले, आम्ही केलेल्या कृत्याचा आम्हाला कसलाही पश्चाताप वाटत नाही. आम्ही कसलाही गुन्हा केलेला नाही. आम्ही संवैधानिक अधिकाराचा वापर केला आहे असं म्हटलं आहे.