बोफोर्सचा कलंक धुवून काढण्यासाठीच राहुल गांधीचे पंतप्रधानांवर आरोप – महाजन

पुणे: बोफोर्स घोटाळ्याचा कलंक धुवून काढण्यासाठी राहुल गांधी सरकारवर आरोप करत आहेत. राफेलवर काँग्रेसकडून केले जाणारे सर्व आरोप ज्या माहितीच्या आधारे केले जात आहेत त्या खोट्या माहितीचे खबरी कोण आहेत हे राहुल गांधी यांनी सांगावं. असं म्हणत खा.पूनम महाजन यांनी केला आहे. काँग्रेसच्या राफेलबाबच्या तक्रारी असतील त्याबद्दल संसदेत चर्चा करावी. परंतु संसदेच्या बाहेर आरोप करत राहुल गांधी देशाची प्रतिमा मलिन करत असल्याचेही महाजन म्हणाल्या.

‘चौकीवर ही चोर हैं’ म्हणत काँग्रेसकडून राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. मात्र मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना राफेलमध्ये घोटाळा झाला नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता भाजपकडून देशभरात सत्तर ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाराष्ट्र भाजयुमो अध्यक्ष आ योगेश टिळेकर, भाजप पुणे अध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरली मोहोळ, नगरसेवक दीपक पोटे उपस्थित होते.