लगद्याच्या गणपतीप्रश्नी ‘हिंदू जनजागृती’तर्फे महापालिका, प्रदूषण मंडळास नोटीस

सोलापूर : राष्ट्रीय हरित लवादाच्या न्यायालयात कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा शासकीय निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध होऊन न्यायालयाने शासनाच्या आदेशाला ३० सप्टेंबर २०१६ यादिवशी स्थगिती आणली. निकालानंतर १० महिने होऊनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्याचा पर्यावरण विभाग यांनी कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे होणाऱ्या प्रदूषणाविषयी कोणतीही जागृती केली नाही.

यंदाच्या गणेशोत्सवाच्या पूर्वीही त्यांनी कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणे चालू केले आहे. त्यामुळे या मूर्तीवर त्वरित बंदी आणली नाही तर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा हिरालाल तिवारी यांनी दिला आहे.

२१ ऑगस्ट २०१७ रोजी तिवारी यांच्यावतीने अॅड. एल. एन. मारडकर यांनी साेलापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या नावे याबाबतची नोटीस दिली आहे. या कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे पर्यावरणाची हाेणार हानी संशोधन संस्था आणि पर्यावरण तज्ज्ञ यांनी स्वत चाचण्या करून सिद्ध केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले आहे. असे असताना प्रदूषण रोखण्याचे दायित्व असतानाही कोणताही अभ्यास संशोधन करताच कागदी लगद्याच्या मूर्तींना इकाे फ्रेंडली ठरवण्याचे कारस्थान होत असल्याचे यात म्हटले आहे. तसेच एका मूर्तीमागे हजार लिटर पाणी प्रदूषित होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

Comments
Loading...