मुंबई : राजकारण हे फक्त सत्तेसाठी करायचं नसत काल जे नितीन गडकरी आपल्या भाषणात बोलले कि आता राजकारण्यांचा आणि राजकारणाचा कंटाळा यायला लागला आहे. ते म्हणाले आता फक्त सत्ताकारणाच राजकारण होत ते बोलले ते सत्य आहे. सत्ता ही लोकशाहीचा कल्याणकारी मार्ग दाखवते त्याच्यात लोककल्याणाची भाषा असली पाहिजे. सत्ता सत्तेसाठी नसावी. त्यामुळे राजकारणाचा खरा अर्थ हा आहे कि जिथे जिथे आपले हाथ गरिबांचे आश्रू पुसण्यासाठी जातात ज्याला ज्याला मदत हवी असते तिथे तिथे आपला हाथ आधारासाठी मदतीसाठी जातो गोरगरीब शोषितांना जिथे गरज असते तिथे आपण धावून जातो सत्ता हि त्यासाठी दुय्यम आहे.
मनात ती भावना असावी आणि मला वाटत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात हि भावना आम्हाला दिसतेय आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात सर्व ठिकाणी आम्ही अशे कॅम्प आयोजित केले. कुठल्या भागातून किती मत मिळतात कुणाला मिळतात हा प्रश्न गौण आहे. पण कुठलाही भाग असो तेथील नागरिकांना मदत झाली पाहिजे. शाळेचा किंवा कॉलेजचा प्रश्न असतो, दाखल्याचा, उत्पनाचा दाखला प्रश्न असतो तहसीलदार कार्यालयात जाणार दोन दोन तास वाया घालवणार त्यापेक्षा या सगळ्या प्रश्नांची उत्तर एका ठिकाणी आल्यानंतर काही तासात जर त्यांना दाखले मिळत असतील. तर हि चांगली जनसेवा असल्याचे मला वाटत असल्याचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- President Draupadi Murmu | “अमृत महोत्सवी वर्षात ही जबाबदारी मिळणं माझ्यासाठी सौभाग्यच”; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली शपथ
- Uddhav Thackeray : “काल एका पक्षानं शिंदे गटाला ऑफर दिलीय, पण…”; राज ठाकरेंच्या विधानावर उद्धव ठाकरेंचा पलटवार
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुखपदी मंगेश चिवटे
- IND vs WI : वेस्टइंडीजवर मात करत भारताने रचला ‘हा’ विश्वविक्रम, पाकिस्तानला टाकले मागे; वाचा!
- Paymate B2B ग्राहकांना व्हिसा कमर्शियल क्रेडिट कार्डद्वारे सुविधा देयके भरणे शक्य
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<