कर्जमाफी कसली ? संघर्ष चालूच राहणार ..

blank

अहमदनगर – राज्यात 34 हजार कोटींची कर्जमाफी झालीं. आणि शेतकऱ्यांच्या क्रांतिकारी आंदोलनाला यश आले. पण ही कर्जमाफी झाल्यावर त्यावरील निकषांनी पुन्हा एकदा राजकार तापवले आहे . अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे हे या कर्जमाफीचे तोंडभरून कौतुक करत आहेत तर याउलट क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष शंकरराव गडाख यांनी मात्र सरकारला चांगलंच धारेवर धरले आहे. या कर्जमाफीवरून अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा जोरदार तापलय. यामध्ये नेवासा तालुक्यातील आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि शंकरराव गडाख यांचा चितपरिचित संघर्ष या निमित्ताने पुन्हा एकदा जोर धरणार हे मात्र नक्की .

या कर्जमाफीवर नक्की काय आहेत या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहुयात .

३० जून २०१६ अखेर जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार ७१३ शेतकर्यांची दीड लाखांच्या आत थकबाकी आहे. त्यांच्या कर्जमाफीसाठी ९७३ कोटी ५१ रुपये जिल्ह्याला मिळतील. जिल्ह्यात दीड लाखांच्या वर थकबाकीदार असलेल्या शेतकर्यांची संख्या ३७ हजार २०२ आहे. त्यांच्यासाठी ६०७ कोटी ७० लाखांची आवश्यकता आहे. सन २०१५-१६ मध्ये ३ लाख ४१ हजार २८६ शेतकर्यांनी कर्जाची परतफेड केली. ज्या १ लाख ८४ हजर ६४९ शेतकर्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केली त्यांना २५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी ४६१ कोटी ६२ लाखांची रक्कम मिळणार आहे. अशाप्रकारे एकूण ३ लाख ९५ हजार ५९४ शेतकर्यांसाठी २ हजार ३३ कोटी ९३ लाखांची रक्कम जिल्ह्याला मिळू शकेल. अर्थात अजून यामध्ये शासन निर्णयातील निकष लागणार असल्याने आकडेवारीत तफावत राहणार आहे .दीड लाखाच्या पुढील थकबाकी असलेल्या शेतकर्यांनी वन टाइम सेटलमेंटकेल्यास त्यांना २५ हजाराची सवलत मिळणार आहे. ते करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत असल्याची अफवा आहे”- प्रा. राम शिंदे पालकमंत्री अहमदनगर

खरीप हंगामाच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय शेतजाऱ्यांच्या पथ्यावर पडणार आहे . या निर्णयातून थकीत कर्जदार शेतकऱ्याला मोठा फायदा होणार असून सगळ्यात जास्त शेतकारी या कर्जमाफी मध्ये बसणार आहेत . इतिहासातील  सगळ्यात मोठ्या कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी घेतला आहे” – बाळासाहेब मुरकुटे – आमदार , नेवासा.

 

एक लाखाच्या आत कोणत्याही शेतकर्‍याचे पीक कर्ज नाही असे असताना देखील या सरकारने निकष ठेऊन कर्जमाफीची घोषणा केली आहे. जे मुख्यमंत्री बोलले तीच भाषा त्यांचे मंत्रीही बोलत आहेत.जोपर्यंत हक्काची संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांच्या हितासाठी संघर्ष सुरूच ठेवनार . सरकारची ही कर्जमाफी आहे की कर्ज वसुली आहे हे कळत नाही. मराठवाडा विदर्भातील शेतकर्‍याचे हित डोळयासमोर ठेऊन या सरकारने राजकारण केले आहे.शेतकर्‍यांच्या हितासाठी संघटीतपणा कायम ठेऊन हक्काची संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालूच ठेवानार”. –शंकरराव गडाख अध्यक्ष , क्रांतिकारी शेतकरी पक्ष