fbpx

राजकारण म्हणजे गुंडांच्या टोळ्या

सयाजी शिंदे

सांगली: अभिनेता सयाजी शिंदे यांना राजकारणात प्रवेशाबद्दल विचारले असता. राजकरण म्हणजे गुंडांच्या टोळ्या आहेत. त्यामुळे मला कुठल्याच राजकीय पक्षात काम करायला आवडणार नाही. असं परखड मत सयाजी शिंदेनी व्यक्त केलं. ते सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

अभिनेते राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहेत त्यामध्ये प्रकाश राज असतील किंवा कमल हसन त्यामुळे आता अभिनेते सयाजी शिंदे राजकारणात येतील का? अशी उत्सुकता प्रेक्षकांना होती. मात्र सयाजी शिंदे म्हणाले, मला सध्यातरी राजकारणात यायला आवडणार नाही. कारण राजकारण म्हणजे गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही पक्षात मला प्रवेश घेता येणार नाही. असं त्यांनी स्पष्ट केलं.