कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक – राणे भिडले

टीम महाराष्ट्र देशा : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या निमित्ताने आज माजी मुख्यमंत्री भाजप नेते नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेना नेते दीपक केसरकर हे एकाच व्यासपीठावर आले होते.

आमदार वैभव नाईक यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तसंच पालकमंत्री उदय सामंत यांच्याही अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला होता. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या अभिनंदन ठरवाला अनुमोदन दिलं.शिवसेना नेते दीपक केसरकर पालकमंत्री असताना सर्वाधिक निधी सिंधुदुर्गात आला. त्यामुळे केसरकरांचं अभिनंदन करावं, असा ठरावही वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत मांडला.

Loading...

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यात भरसभेत बाचाबाची झाली. खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री, शिवसेना नेते उदय सामंत यांच्या मध्यस्थीमुळे वादावर पडदा पडला.

सभेच्या सुरुवातीलाच नारायण राणेंनी दीपक केसरकर यांना टार्गेट केलं. केसरकरांनी गेल्या पाच वर्षात विकासाचं राजकारण केल्याचा आरोप राणेंनी केला. केसरकरांच्या अभिनंदन ठरावावरुन नियोजन सभेत दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गोंधळ घातला.नितेश राणे आणि वैभव नाईक हे भरसभेतच एकमेकांना भिडले. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. मात्र नारायण राणे आणि उदय सामंत यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणावर पडदा टाकला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण