पुणे: दादोजींच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड आणि ब्राह्मण महासंघ आमने-सामने

dadaji kondadev

पुणे: त्रिपुरा मधील लेनेनचा पुतळा हटवण्याचा वाद ताजा असतांनाच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज सकाळी पुणे महापालिकेच्या आवारात दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा बसवून त्याचे पूजन केले. दादोजी कोंडदेव यांची आज पुण्यतिथी आहे. पण काही वेळातच महापालिकेनं ही प्रतिमाही काढून टाकली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यावरून राजकारण पेटण्याची चिन्ह दिसत आहे.

ब्राह्मण महासंघाने दादोजींचा लाल महालातून काढून टाकण्यात आलेला पुतळा पुन्हा बसवावा, अशी मागणी केली. मात्र संभाजी ब्रिगेडचा लाल महालात पुन्हा पुतळा बसवण्यास तीव्र विरोध केला आहे. ब्राम्हण महासंघाने महापालिकेत दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्र घेतला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत येऊन जोरदार दंगा केला आणि ब्राम्हण महासंघाला दादोजी कोंडदेवांची प्रतिमा विनापरवागी बसवली असल्याने ती काढून घ्यायला लावली. ब्राम्हण महासंघाने केवळ पूजेसाठीच प्रतिमा लावल्याची भूमिका घेतली आहे.

Loading...

लाल महालात शिवाजी महाराजांच्या सोबत दादोजी कोंडदेवाचा पुतळा काढण्यावरून प्रचंड वाद वाद झाला होता. हा पुतळा अभ्यास समितीच्या निष्कर्षावरून हटवण्यात आला होता. आज दादोजी कोंडदेव यांची पुण्यतिथी असल्याने आज पुन्हा ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा घेऊन महापालिकेच्या आवारात आले.त्यांनी याठिकाणी प्रतिमेचे पूजन केले.

dadaji kondadev

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज इतिहास घडवला आहे. गेली अनेक वर्षे सतत मागण्या ,विनंती करून ही ना नगर पालिकेला जाग आली ना सरकारला. आपणच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज माननीय दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यांच्या प्रतिमेची पुणे महानगर पालिकेत जाऊन प्रतिष्ठापना केली. तसेच आपले हे शहर सुद्धा इतर राज्या प्रमाणे पुतळे तोडणारे शहर म्हणून कु प्रसिद्ध न राहता येथे पुतळे परत लावणारे सुद्धा आहेत हे पण देशाला दाखवण्याचा हा प्रयत्न आहे

संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले, पुण्यात ‘ब्राम्हण महासंघ’ दादोजी कोंडदेव’ यांच्या पुतळ्याचे जातीयवादी राजकारण करत आहे. इतिहासाचे विकृतीकरण करून काही तथाकथित इतिहासकारांनी स्वतःच्या वर्णश्रेष्ठत्वासाठी कोंडदेवांना गुरूस्थानी बसवले. हा इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. तो वेळीच संपवला पाहिजे. लालमहालात जिजाऊ-शिवरायांच्या समुहशिल्पा मध्ये महाराज शहाजीराजे भोसले यांचा पुतळा बसवावा म्हणून मागणी आहे. शहाजीराजेंची जयंती १८ मार्च रोजी आहे. आम्ही सतत मागणी करत आहोत म्हणून आज ‘ब्राम्हण महासंघाला’ दादू कोंडदेवांचा पुळका येत आहे. परंतु हे दुर्दैवी आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत