बॉलीवूडची चांदणी निखळली!‘हवाहवाई’ला नेते-अभिनेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

टीम महाराष्ट्र देशा- अष्टपैलू अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. श्रीदेवींच्या अचानक जाण्याने बॉलीवूड शोकसागरात बुडाले असून या धक्कादायक बातमीनंतर आता आदरांजली वाहणाऱ्या प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री काळाच्या पडद्याड गेली आहे. ही बातमी कळताच ‘हवाहवाई’ला नेते-अभिनेत्यांनी श्रीदेवी यांना ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.

रजनीकांत
मी माझी एक खूप चांगली मैत्रीण गमावली. तसेच सिनेसृष्टीने एक महत्त्वाची अभिनेत्री गमावली आहे. तिच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. तू कायम स्मरणात राहशील

अक्षय कुमार
बातमी ऐकून काय म्हणावे यासाठी शब्दच नाहीत. त्यांच्यासोबत काही वर्षांपूर्वी काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे नशीब समजतो. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे.