fbpx

पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय उलथापालथ, महापौर उपमहापौरांचा राजीनामा

पिंपरी : पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांनी आपला राजीनामा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे. त्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापौर बदलाच्या चर्चा सुरू होत्या, अखेर आज निकाळजे यांनी राजीनामा दिल्याने या चर्चाना पूर्णविराम मिळणार आहे. तसेच आता नवीन महापौर कोण होणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

तर त्या पूर्वी उपमहापौर शैलजा मोरे यांनी महापौर नितीन काळजे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला होता. आता पिंपरी चिंचवड मध्ये नवा गडी अन नव राज्य सुरु होणार असल्याने इच्छुकांनी चांगलीच मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका बरखास्त करा- काँग्रेस

महापौर पदासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेतर्फे अर्ज दाखल