उस्मानाबाद लोकसभेला कॉंग्रेस की राष्ट्रवादी, कोण असतील उमेदवार

political scenario in osmanabad lok sabha

उस्मानाबाद : राज्यातील बहुतांश उमेदवारांबाबत जवळ जवळ निर्णय झालेले असताना उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवारांबाबत शिवसेना सोडली तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेद्वारांबाबतचे आणखीही गूढ उलघडायला तयार नाही. शरद पवारांचे निकटवर्ती निष्ठावंत व पक्ष प्रतोद त्यातही नातेवाईक असलेल्या डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या जागेबाबात कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये मतभेत असण्याचे कारण नव्हते, मात्र तुळजापूचे आमदार माजी मंत्री मधुकर चव्हाण, औशाचे बसवराज पाटील यांचा डॉक्टर पद्मसिंह पाटील किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाबाबत फारसा उत्साह जाणवत नाही. डॉ. पद्मसिंह पाटील जोपर्यंत स्वतः आपण इच्छुक नाहीत हे स्पष्ट करणार नाहीत तो पर्यंत बार्शीचे आमदार माजी मंत्री दिलीप सोपल हे उघडपने मी इच्छुक आहे, असे स्पष्ट करताना दिसत नाहीत.

पक्षाने आदेश दिला तर मी तयार आहे अशी सावध भूमिका सोपल यांची आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीत प्रथमच त्यांचा 2014 साली पराभव झाला, त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार मागच्या वेळचे उमेदवार व विद्यमान खासदार प्रा. रविंद्र गायकवाड हेच असतील तर डॉ. पद्मसिंह पाटील हे पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्वतः निवडणूक लढवतील असा अंदाज आहे. शिवसेनेने प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या नावा ऐवजी ऐन वेळेला ज्ञानराज चौगुले , शिवाजी सावंत, तानाजी सावंत अथवा शंकर बोरकर यांच्या नावांचा विचार केला तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबात उमेदवारीचा आग्रह होऊ शकतो, मात्र कॉंग्रेस पक्षाचा त्या नावाला विरोध पाहता ही उमेदवारी दिलीप सोपल यांच्यासाठी योग्य होऊ शकते.

डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील नावाला होत असलेला कॉंग्रेसच्या विरोधा मागे मागील काही महिन्यातील आमदार दिलीप सोपल, आमदार मधुकर चव्हाण यांच्या बैठकीची पार्श्वभूमी आहे ही बाब डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या निरीक्षणातून चुकलेली नाही. त्यामुळे डॉ. पद्मसिंह पाटील हे मला नसेल तर आमच्या पक्षातील कोणालाच नको त्यामुळे सरळ ही जागा कॉंग्रेसला सोडा अशी स्पष्ट भूमिका डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडून घेतली जाऊ शकते. अशावेळी कॉंग्रेस पक्षाकडे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाच्या पूर्व भागातून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, वैशाली विलासराव देशमुख( लातूर) , बसवराज पाटील ( औसा),) मतदार संघातील तर बार्शी भूम परांडा या पश्चिम भागातील बार्शी कॉंग्रेसचे अध्यक्ष अड. जीवनदत्त आरगडे यांच्या उमेदवारीचा पर्याय पक्षाकडे आहे.

Loading...

चार महिन्यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीमध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेचा सूर असाच होता की सेना भाजपने जर उमेदवार पूर्व भागातील म्हणजे औसा उमरगा तुळजापूर उस्मानाबाद यांपैकी दिला तर कॉँग्रेसची उमेदवारी पश्चिम भागातील प्रामुख्याने एकसंघ तालुका विधानसभा मतदार संघ असलेल्या व तीन लाख मते एकत्रित असलेला एकच तालुका असलेल्या बार्शीकडे पर्यायाने अॅड. जीवनदत्त आरगडे यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळू शकते. बार्शी तालुक्यातून एकच उमेदवार असेल तर बार्शी तालुक्यातून आरगडे यांना  पाठींबा मिळेल ही बाब सुद्धापक्ष निरीक्षकांनी पक्ष श्रेष्ठींसमोर निदर्शनास आणून दिलेली आहे.

नव्या चेह-याच्या तरुणांना पक्षात संधी देण्याची भूमिका कोंग्रेस पक्षाने घेतली आणि अॅड. जीवनदत्त आरगडे यांना ही उमेदवारी मिळाली तर आरगडे यांच्या नावाला कोणाचाही विरोध होणार नाही. पूर्व भागातून तुळजापूरचे आमदार मधुकर चव्हाण, औसाचे आमदार बसवराज पाटील, माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या अधिपत्याखालील काही भाग माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अधिपत्याखालील काही भाग व उस्मानाबाद कळंब वाशी भूम परांडा येथील राष्ट्रवादीचे सहकार्य मिळाले तर स्थानीक उमेदवार म्हणून बार्शीचा मिळणारा पाठींबा पाहता या मतदार संघातून अॅड. जीवनदत्त आरगडे यांच्या रूपाने एक नवा चेहरा लोकसभेत प्रवेश करू शकतो.

माजी गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे आरगडे हे कट्टर समर्थक असून बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचे बालपणीपासून सर्व राजकीय वाटचालीतील सहकारी मित्र जुगलकिशोर तिवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आरगडे हे कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे संपत कुमार व सोनल पटेल यांच्यासह इतर उमेदवार निवड समितीच्या संपर्कात आहेत. त्यातच बार्शीचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांचा प्रा.रविंद्र गायकवाड यांच्या नावाला होत असलेला विरोध हा मोठ्या प्रमाणात आहे. एकूणच जुन्या चेह-यांपेक्षा नवीन चेहरे येण्याची शक्यता आरगडे यांचे नाव वगळता या निवडणुकीत तशी फारशी दिसत नाही.

माळशिरसचे नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे चिरंजीव हे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने त्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवाडीकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा वाद मिटवून सोपल यांना लोकसभा व राऊत यांना विधानसभा अशी खेळी होण्याचीही चर्चा होत आहे. एकूणच या निवडणुकीमध्ये अर्ज भरेपर्यंत व निकाल लागेपर्यंत काय काय घटना घडतील याची गती मात्र खूप थंडावलेली दिसते कारण तीवर इच्छुक असा या मतदार संघात कोणाकडेच उमेदवार दिसत नाही.

1 Comment

Click here to post a comment