कोपर्डीतील नराधमांवर अखेर आरोप सिद्ध; वाचा कोणी दिली काय प्रतिक्रिया

कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी नक्की काय निकाल येणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते. आज या प्रकरणातील तिन्ही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आला आहे. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे. तीनही आरोपींवर आता येत्या २२ तारखेला शिक्षेची सुनावणी होणार आहे.

दरम्यान सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून या निर्णयानंतर समाधान व्यक्त करण्यात आल आहे.

माझ्या छकुलीचे जसे लचके तोडले, तसं त्या नराधमांचेही लचके तोडा, अशी तीव्र प्रतिक्रिया नगरच्या निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे.