पंजाब कॉंग्रेसमध्ये पुन्हा राजकीय भूकंप; नवज्योत सिंग सिद्धूने दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

पंजाब कॉंग्रेसमध्ये पुन्हा राजकीय भूकंप; नवज्योत सिंग सिद्धूने दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

sidhu

नवी दिल्ली : पंजाब कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री असणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तर आता पंजाबचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष असणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते काँग्रेस पक्षाचे सदस्य राहतील. आज पंजाबमध्ये नवीन मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे आणि काही तासांनंतर सिद्धू यांनी सोनिया गांधींना आपला राजीनामा पाठवला आहे.

अलीकडेच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्याचे सिद्धू हे कारण असल्याचे अमरिंदर सिंग यांनी सांगितले होते. सिद्धूसोबत काम करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी सिद्धूवर वारंवार हल्ले केले, अगदी त्याला देशद्रोही देखील म्हटले गेले होते. या सर्व घटनांमुळे सिद्धू नाराज असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या