Pune- लोकप्रतिनिधि कडूनच शहराच विद्रुपीकरण

पुणे :  व्यवसायीकांकडून लावलेल्या अनधिकृत फलकांवर काल पिंपरीत करवाई करण्यात आली. त्या पार्श्वभूमी वर नगरसेवकांकडून होणाऱ्या जाहिरात बाजी वर महापालिका करवाई कधी करणार ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात रस्ते,कॉलनी किंवा चौकाला लोखंडी पाट्या लावून स्वतःच नाव देण्याचा प्रकार घडत आहे.तसेच बऱ्याच ठिकाणी फेलक्स लावून शहराच विद्रुपीकरण होत आहे. शहरातील प्रत्येक मुख्य चौकात राजकीय जाहिरातबाजी वाढत आहे. सन असो किंवा राजकीय लोकांचे वाढदिवस त्यानिमित्त पोस्टरबाजी पहायला मिळते. आता हा प्रकार शहरातील कॉलेज समोर पण घडतो आहे. शहरातील नामांकित कॉलेज समोर वाढदिवसाचे शुभेच्छा फलक लावलेले असतात. विरोध केल्यास राजकीय नेत्यांकडून  दमदाटी करण्यात येते. अधिकृत जागी अनधिकृत फलक लावले जातात. प्रशासन  मात्र याकडे  दुर्लक्ष करते. त्यामुळे शहराच सौंदर्य नष्ट होत आहे.

आजकाल लोक प्रतिनिधि कडून काम कमी आणि जाहिरात जास्त पहायला मिळते. नवीन काम करायची असेल तर फेल्क्स लावण्यात येतात. शुभेच्छा फलकाच्या स्वरूपात पण वास्तवात काम मात्र काहीच नसते. महत्व कामाला आहे की जाहिरातबाजिला हाच मोठा प्रश्न आहे. महापालिकेने निपक्ष राहून अनधिकृत जाहिरात करणाऱ्यावर करवाई करावी.
शेखर वाघ , पुणे

शहरातील फ्लेक्स मुळे अनेक वेळा दिशादर्शनासाठी जे फलक असतात ते देखील दिसत नाही. तसेच फ्लेक्सवर  लिहिले जाणारे मजकूर काही वेळा दादागिरी ची भाषा करणारे असतात .आजकाल कोठेही जागा मिळेल तिथे फ्लेक्स लावलेले असतात अनधिकृत फ्लेक्स वर कडक कारवाई व्हायला पाहिजे.
प्राची आमले , पुणे