‘कोरेगाव भीमा’ हिंसाचारामागे राजकीय लोक ; मा गो वैद्य

हिंसाचार राजकीय लोकांनी मुद्दाम घडवला

टीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीनंतर जो हिंसाचार झाला याच्या मागे राजकारणी लोक असून हे मुद्दाम घडवून आणल्याचा संशय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांनी व्यक्त केला आहे.

कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद पाळला होता. बंद दरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार, दगडफेकीच्या घटना घडल्या. या संदर्भात बोलतांना मा गो वैद्य म्हणाले, या आंदोलनाला मराठा विरीद्ध दलित असे स्वरूप न देता त्याला हिंदुत्वनिष्ट विरुद्ध दलित असे स्वरुप दिले. पण हे सर्व २०१९ पर्यंत चालण्याची श्यक्यता आहे.