राजकीय पक्षांनी तिहेरी तलाकवर राजकारण करू नये :शायरा बानो

sayra bano

पुणे : तिहेरी तलाक पद्धतीच्या प्रश्नावर राजकीय पक्षांनी कोणताही राजकीय वाद न उभा करता सामाजिकदृष्टीने तसेच मुस्लीम महिलांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील अशा या विषयावर सर्वांनी एक होऊन महिलांना न्याय मिळवून द्यायला हवा असे मत तिहेरी तलाक पद्धती विरोधातील याचिकाकर्त्या शायरा बानो यांनी व्यक्त केले.

मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फ़े आयोजित वार्तालापात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अध्यक्ष डॉ शमसुद्दीन तांबोळी, शायरा बानो यांचे बंधू अर्शद अली, शकील अहमद हे देखील उपस्थित होते.
या वार्तालापादरम्यान त्यांनी तिहेरी तलाकच्या संबंधित विविध प्रश्नांवर रोकठोक मत व्यक्त केली .

बानो यांचे बंधू अली यांनी बोलताना आजही समाजात महिलांचा आवाज दाबून टाकण्याची मानसिकता जिवंत असल्याचे सांगितले. तर सर्वोच्च न्यायालयाने याबाबत कायदा करण्यासाठी सरकारला दिलेल्या कालावधीतील दोन महिने संपले असून कायद्यात नेमके काय अपेक्षित होते याविषयीची आमच्याकडे काहीही विचारणा करण्यात आली नसल्याचा गौप्यस्फोट बानो यांनी केला

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...