मोदी सरकार आणि वाढत्या महागाई विरोधात राजकीय संघटनांचा एल्गार !

maharashtra political party

टीम महाराष्ट्र देशा: वाढत्या पेट्रोल-डीझेल दाराच्या विरोधात जनतेमध्ये संतापाची लाट पसरत आहे. तसेच विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त करीत आहेत. राज्यात ठिकठिकाणी महागाई व मोदी सरकार विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत दरम्यान, “इंधनांच्या किमंती कमी केल्यास त्याचा विकास कामांवर परिणाम होईल. असे स्पष्ट केले.

Loading...

ठाणे- गेल्या दोन तीन दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता मनसेनेही आंदोलन छेडले. गुरूवारी मनसेचे ठाणेशहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरात आंदोलन करुन या दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला. दरम्यान, कर्नाटक निवडणुकी नंतर रोजच्या रोज पेट्रोल, डिझेलच्या दरवाडीने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतांना या कुंभकर्णी सरकारला याचे काहीच सोयरसुतक नाही. रोजच्या रोज भाववाढी मुळे, महागाईचा भडका उडाला असून भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहे. असे स्पष्ट करण्यात आले.

सार्वजनिक वाहतुकीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे, शाळेच्या बसेसचे भाववाढ झाली असून या सर्व गोष्टींचा सरळ सरळ सामान्य जनतेला याचा मार सहन करावा लागत आहे. यामुळे पेट्रोल डिझेल दरवाढच्या निषेधार्थ मनसेने मोदी सरकार विरोधात अनोखे आंदोलन केले. तसेच परभणीत देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मोटारसायकल झाडाला लटकावून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला.

अहमदनगर- देशात व राज्यात दररोज इंधनाचे दर वाढत असून, सरकार याद्वारे सामान्य जनतेची लूट करत आहे. यामुळे सरकारविरोधात जनतेतून तीव्र असंतोष उमटत आहे. सरकारच्या या इंधन दरवाढीविरोधात शहर काँग्रेसच्या वतीने गुरूवारी दुपारी ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात आले. स्टेट बँक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कार्यकर्त्यांनी दुचाकी वाहने ढकलत नेली. तसेच नागपूर शहरात वाढत्या महागाई विरोधात युवक काँग्रेस बुधवारी रस्त्यावर उतरली. संविधान चौकात निदर्शने करीत दरवाढीचा निषेध करण्यात आला. महागाई वाढवून भाजप सरकार अच्छे दिन कसे आणणार, असा सवाल या वेळी कार्यकर्त्यांनी केला.

सातारा- इंधन दर वाढीबरोबरच इन्शूरन्स आणि टोलनाक्यावरील अनागोंदी बंद करण्यासाठी सातारा जिल्हा माल व प्रवासी वाहतूक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याला आला. यावेळी इंधन दरवाढ बंद करा…टोलनाक्यावरील अनागोंदी बंद करा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...