अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे 

सोलापूर -( सूर्यकांत आसबे ) – समविचारी पक्षाने एकत्र येऊन मतांचे विभाजन टाळले पाहिजे हाच भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या मतविभागणीचा फायदा होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याचे संकेत बुधवारी सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिले. निवडणूक जसजशा जवळ येतील तसतसे चित्र स्पष्ट होईल असेही दानवे यांनी सांगितले. राजकारणात कोणताही अल्टिमेटम नसतो उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात असेही ते म्हणाले.

भाजप मवाळ नाही. एनडीएने एकत्र राहावे आणि एकत्रित निवडणूक लढवाव्यात हि आमची भूमिका आहे. भाजप गरज पडेल तेथे मवाळ आणि गरज पडेल तेथे ताठर आहे असेही दानवे यांनी ठणकावून सांगितले. पाच यावर्षात राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. राज्यात १० हजार सरपंच, १८ मनपा, १० झेडपी, ९० नगरपालिका , २३ खासदार, १२३ आमदार आणि एक मुख्यमंत्री एवढे पाठबळ भाजपच्या पाठीशी आहे. या ताकतीचा जोरावरच आगामी २०१९ ची निवडणूक भाजप जिंकेल असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी व्यक्त केला.

Loading...

राज्यात वेगवेगळ्या आघाड्या होत आहेत. २०१९ ची निवडणूक या आघाड्यांच्या अस्तित्वाची आहे. या आघाड्या जिंकण्यासाठी नव्हे तर अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहेत. उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यांनी केलेल्या युतीचा कोणताही परिणाम भाजपवर होणार नाही. १९९३ साली भाजप ठरविण्यासाठी हेच दोघे एकत्र आले होते परंतु त्यावेळी भाजपने या दोघांना टक्कर देत ४ टक्के अधिक मते घेतली होती. त्यामुळे कोणी कोणासोबत जावो एनडीए मात्र एकत्र राहून २०१९ ची निवडणूक लढेल आणि नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वासही दानवे यांनी बोलून दाखविला.

कर्नाटकातील राजकीय घडामोडीबाबत बोलताना दानवे म्हणाले, आमचे आमदार आमच्यासोबत आहेत. भाजप कोणतेही सरकार स्वतःहून पाडण्याच्या मनस्थितीत नाही. सरकारच्या निराशेपोटी दोन आमदारांनी पाठिंबा काढला असला तरी सध्या आमचा तसा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान भाजप सरकारने पुणे, मुंबई, नागपूर मेट्रो, राज्यभरातील हायवे, शेतकऱयांची कर्जमाफी आणि मागेल त्याला शेततळे आदी विकासकामे भाजप सरकारने केली आहेत. भाजप आगामी निवडणूक विकासाच्या मुद्यांवर लढविणार आहे, असेही दानवे म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार : रामदास आठवले
सावधान : मुंबई आणि पुण्यातही आढळले‘कोरोना'चे संशयित रुग्ण