‘राजकीय नेते रॅली काढू शकतात मात्र उद्योग आणि कामं आवश्यक नाहीत’

अनमोल अंबानी

मुंबई: गेल्या वर्षभरापासून कोरोना निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे उद्योग व्यवसाय डबघाईला आले असून रोजगार निर्मितीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे कामगार वर्गासह उद्योजकांकडून देखील संपूर्ण लॉकडाऊन करण्याला विरोध करण्यात येत होता.

विरोध दर्शवणाऱ्यांमध्ये महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांचाही समावेश होता. त्यानंतर आता उद्योगपती अनिल अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांनी महाराष्ट्रातील मिनी लॉकडाऊनवर ताशेरे ओढले आहेत. अनमोल यांनी ट्विट करत लॉकडाऊनवर टीका केली आहे.

‘ चित्रपटांचे शूटिंग सुरू आहे, खेळाडूंचे क्रिकेट सुरू आहे, राजकीय नेत्यांच्या जमावर सोबतच्या रॅली देखील सुरू आहेत. मात्र उद्योग आणि काम आवश्यक नाही.’ असं खोचक ट्विट त्यांनी केलं आहे. त्याच बरोबर ‘अत्यावश्यक सेवा म्हणजे नेमकं काय? प्रत्येकाला त्याचं काम आवश्यक असत’ अस देखील त्यांनी यावेळी म्हटल. त्यामुळे आता अंबानी कुटुंबातून लॉकडाऊनवर टीका झाल्यानं याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या