महापुरुषांपेक्षा राजकीय नेतेच मोठे! औरंगाबाद महापालिकेतील प्रकार

co aurangabad

औरंगाबाद: महापौर नंदकुमार घोडले यांच्या कार्यालयातील चेंबरच्या भिंतीवर शिवसेना व भाजप नेत्यांची फोटो लावलेले आहेत. त्यामुळे महापुरुषांच्या फोटोला महापौर दालनात जागाच नसल्याचे चित्र आहे. महापुरुषांपेक्षा राजकीय नेत्यांना जास्त महत्व दिल्याचे समोर आले आहे. राजकीय नेत्यांच्या फोटोच्या गर्दीमुळे महापुरुषांच्या फोटोला अँटी चेंबर मध्ये लटकवण्यात आले.

महापुरुषांचे विचार, कार्याची समाजाला दिशा व प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शासनाकडून त्यांचे चरित्र व साहित्य प्रकाशित केले जाते. संशोधक, अभ्यासकांसाठी हे साहित्य मौल्यवान ठेवा असतो. त्याचबरोबर शासनाकडून महापुरुषांचे छायाचित्रतही छापले जाते. ते अधिकृत छायाचित्र असते. त्यामुळे या छायाचित्रांना राज्यभरातून मोठी मागणीही असते. यातून शासनाला महसूलही मिळत असतो. शासनाच्या नियमानुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये महापुरुषांची छायाचित्रे लावणे बंधनकारक आहे. कार्यायप्रमुखाने शासकीय मुद्रणालयातून महापुरुषांची छायाचित्रे विकत घेऊन त्याची फ्रेम करून कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्याबाबत शासन निर्णयात नमूद आहे. परंतु औरंगाबादच्या महापौर साहेबांनी हे सर्व नियम धाब्यावर मारत चेंबर च्या भिंतीवर राजकीय नेत्यांच्या फोटोंना स्थान दिले आहे

mahapurush( अशाप्रकारे महापुरुषांच्या फोटोला अँटी चेंबर मध्ये  लटकवण्यात आले )