‘ पोलिटीकल किडा ‘ प्रभादेवीतून येतो का?आशिष शेलारांना संशय

shelar aashish

टीम महाराष्ट्र देशा:’ पॉलिटिकल किडा ‘ नावाचे ट्विटर अकाऊंट सुरु आहे. हा किडा प्रभादेवीकडून येतो की काय? यावर आमचे लक्ष आहे,असे आशिष शेलार यांनी मत व्यक्त केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवरायांच्या रुपात, तर गृहमंत्री अमित शाह हे तानाजी मालुसरेंच्या रुपात दाखवणारे मॉर्फ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पॉलिटिकल किडा या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सरळ निशाणा साधला आहे.

गेल्या दोन – तीन दिवसांत आपण पाहतो आहोत की, सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा फोटो लावून एक नवीन संविधान दिले असे चुकीची पोस्ट व्हायरल केली गेली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी यांच्याबाबत चुकीची क्लिप आली. सीएएला विरोध करणाऱ्या रॅलीमध्ये शाईनबागमध्ये दिल्लीला जसोदाबेन मोदी गेल्या होत्या, असे दाखवण्यात आले.

Loading...

या तिन्ही क्लिपवर आम्ही एवढे सांगू इच्छितो की, आम्हाला विचारधारेच्या युद्धामध्ये जमिनीवर जे हरवू शकत नाहीत, जे पराभूत करु शकत नाहीत ते ‘आभासी दहशतवाद’ निर्माण करत आहेत. हा भाजपला आणि संघ परिवाराला बदनाम करण्याचा कट आहे,असेही आशिष शेलार पुढे  म्हणाले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण