‘राजकीय हस्तक्षेपामुळे राज्यातील पोलिसांना त्यांचे काम करता येईना’, भाजपचा आरोप

KESHAV UPADHYE

मुंबई: दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2 पाकिस्तानी नागरिकांसह एकंदर सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली. दिल्लीमध्ये काल 6 दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याची माहीती मिळाली अन् राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरूनच भाजप नेते केशव उपाध्ये यांनी सरकारवर निशाना साधला आहे.

‘जगातील सर्वोत्तम समजलं जाणाऱ्या महाराष्ट्र पोलिसदलाला आज राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना काम करता येत नाही. गंभीर गुन्ह्यांचं काम सोडून सरकारला विरोध करणाऱ्या प्रत्येकाविरोधात पोलिस वापरले जात आहेत. त्याचा परिणाम राज्याला परवडणारा नाही.’ असे ट्वीट करत केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले आहेत. वळसे-पाटील यांनी तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला एटीएसचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे रेल्वेनेही उच्चस्तरीय बैठक बोलावली असल्याची माहीती मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या