राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक

टीम महाराष्ट्र देशा – सत्ता स्थापनेचा कानडी पॅटर्न देशाने बघितला आहे. परंतु या नाट्यवर अजूनतरी शेवटचा पडदा पडलेला दिसत नाही. आता भाजपचे २५ आमदार नाराज असल्याच वृत्त आहे. कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा नाटकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे २५ आमदार मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये पुन्हा राजकीय भुकंप होतो की काय, अशा शक्यता निर्माण झाली आहे.

नाराज आमदारांनी बैठक बोलविली होती. माजी उपमुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर एक पत्रही प्रसिद्ध कऱण्यात आले आहे. मात्र या पत्रावर कोणाचेही हस्ताक्षर नाही.  त्यामुळे या पत्राच्या विश्वासहार्तेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

Loading...

दरम्यान मराठी वृत्तवाहिनी  न्यूज 18 लोकमतला एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर राज्यात येडीयुरप्पा यांचे चिरंजीवच सुपर सीएम झाल्याचे म्हटले आहे. यानंतर काँग्रेस नेत्याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. जेंव्हा असंविधानिक काम करून सत्ता स्थापन करण्यात येते. त्यावेळी असं होणारच आहे.

येडीयुरप्पा आजपर्यंत कधीही आपला कार्यकाळ पूर्ण करू शकलेले नाहीत, असं काँग्रेसनेते बृजेश कलप्पा यांनी सांगितले. कर्नाटकच्या राजकारणात येडीयुरप्पा यांच्या वाढत्या वयाची चर्चा जोरात सुरू आहे. भाजपमध्ये ७५ वर्षापर्यंतच नेत्याला पदावर कायम ठेवण्यात येते. येडीयुरप्पा यांचे वय ७७ झाले आहे.

त्यामुळे आगामी काळात कर्नाटकच्या राजकारणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कर्नाटकात सत्तेचे अजून किती पॅटर्न बघायला मिळणार हे बघण महत्वाच ठरणार आहे.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....