राजस्थानातील गेहलोत सरकार संकटात; पायलट गट भूकंप घडवण्याच्या तयारीत

ashok gehlot vs sachin pilot

जयपूर : राजस्थानातील अशोक गेहलोत सरकार पुन्हा एकदा संकटात अडकण्याची चिन्हं आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी उपमुख्यमंत्री सचिन पायलट गटानं आक्रमक पवित्रा घेतलाय. जुलैपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करा अन्यथा पुढचा स्वतंत्र मार्ग आमच्यासाठी खुला  असल्याचं पायलट गटाचं म्हणणं आहे. तसा थेट अल्टिमेटमचं पायलट गटानं गेहलोत सरकारला दिला आहे.

मागील २ दिवसांपासून आमदारांच्या विविध बैठका सचिन पायलट यांच्या घरात सुरू आहेत. या बैठकीत पार्टी नेतृत्वाकडे आपलं म्हणणं मांडण्याची रणनीती आखण्यात आली आहे. इतकचं नाही तर सचिन पायलट समर्थक पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांच्याशी पुढील महिन्यात भेटीसाठी वेळ देखील मागितली आहे.

दरम्यान, दोन दिवसांनी राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीदिवशी होणाऱ्या कार्यक्रमात सचिन पायलट त्यांची राजकीय ताकद दाखवण्यासाठी प्लॅन आखत आहेत. पायलट समर्थक आमदार पुन्हा एकदा दिल्ली अथवा शेजारील राज्यात जाऊन सरकारविरोधात बंडखोरी करू शकतात अशी माहिती सरकारला मिळाली आहे.यामुळेच सरकारने दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि गुजरातला लागून असलेल्या सीमांवर चौकशी वाढवली आहे. केव्हाही बॉर्डर सील केल्या जाऊ शकतात अशी देखील माहिती आहे.

दरम्यान, पायलट यांच्या सोबत आमदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधीही जाण्याची शक्यता आहे. यावेळी गहलोत यांच्या समर्थकांमधील काही आमदार सचिन पायलट यांच्या संपर्कात आहेत. संधी मिळताच हे आमदार पायलट याच्या गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

 

IMP