गेहलोत सरकारवरील संकट महाराष्ट्रातील ‘हा’ धुरंधर नेता करणार दूर, राजस्थानाकडे रवाना होण्याची सूचना

ashok gehlot

जयपूर – राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशा आशयाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. पण आपण काही झाले तरी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सचिन पायलट यांनी सांगितले आहे. भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांची सचिन पायलट भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण एनडीटीव्हीशी बोलताना हे वृत्त सचिन पायलट यांनी फेटाळून लावले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये आज काँग्रेस विधीमंडळाची बैठक होत आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे. यासाठी सर्व आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. मात्र सचिन पायलट या बैठकीला हजर राहणार नाहीत.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या अत्यंत विश्वासू असणारे खासदार राजीव सातव यांच्यावर एक मोठी जबाबदारी टाकली आहे. सातव याना राजस्थानकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सातव यांना तात्काळ राजस्थानला रवाना होण्याचे आदेश राहुल गांधी यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या राजीव सातव हिंगोलीत आहेत.

दरम्यान, दुसरीकडे अशोक गहलोत यांच्या जवळच्या उद्योगपतींवर आयकर विभागाचे छापे पडण्यास सुरुवात झाली आहे. आयकर विभागाचे 200 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिल्लीपासून राजस्थानपर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकले. ही सर्व ठिकाणं अशोक गहलोत यांच्या निकटवर्तीयांची असल्याचं सांगितलं जात आहे.

अशोक गहलोत यांचे निकटवर्ती आणि ज्वेलरी फर्मचे मालक राजीव अरोरा यांच्या ठिकाणांवर आज (13 जुलै) सकाळी आयकर विभागाची पथक दाखल झाली. त्यांनी अरोरा यांच्या घरासह कार्यालयावर छापे टाकले. राजीव अरोरा यांच्या व्यतिरिक्त धर्मेंद्र राठोड यांच्या देखील घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली. विशेष म्हणजे या छाप्यांची माहिती स्थानिय पोलिसांनाही देण्यात आली नव्हती. आयकर विभागाच्या पथकाने केंद्रीय राखीव पोलीस दलासोबत ही कारवाई केली.

महत्वाच्या बातम्या-

अक्षय कुमारचा येणारा ‘हा’ चित्रपट आणखी लांबणीवर

‘भाजपा’त प्रवेश करणार नाही; सचिन पायलट यांनी केला मोठा खुलासा

कॉंग्रेसला मोठा धक्का,आमदारकीचा राजीनामा देत ‘या’ बाहुबली नेत्याने केला भाजपात प्रवेश

‘ती’ तर आमची चाल, सत्तास्थापनेवर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट