टीम महाराष्ट्र देशा- आज छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. भुजबळ यांनी २ एप्रिल रोजी जामिनासाठी अर्ज केला होता, न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने आज जामीन मंजूर केला . त्यामुळे गेली दोन वर्षापासून तुरुंगात असणारे भुजबळ यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत पाहूया काही निवडक प्रतिक्रिया .
माझे विधिमंडळातील सहकारी आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, खरं तर हा जामीन यापूर्वीच मिळायला हवा होता. छगन भुजबळ यांनी न्यायालयीन चौकशीला पूर्ण सहकार्य केले आणि यापुढेही करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. #chhaganbhujbal
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 4, 2018
Shri Chhagan Bhujbal granted bail by Mumbai High Court. NCP seems to be celebrating. But I would like to remind them that this is only a BAIL. He has NOT been acquitted. All charges against him have been established and it is a matter of time before he goes back to prison.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 4, 2018
Chhagan Bhujbal has got bail. So much for no bail for PMLA accused!
The agencies have enough evidence to convict him, don't know how long this charade will continue in black and white case of money laundering and kickbacks.— Preeti Sharma Menon (@PreetiSMenon) May 4, 2018
"भगवान के घर देर है, पर अंधेर नहीं" असे म्हणतात, त्याचा प्रत्यय आज आला आहे. यापुढची लढाई देखील आपण सर्वजण लढू.भुजबळ साहेबांना न्याय मिळेपर्यंत @NCPspeaks चा एकही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. (2/2)
— Supriya Sule (@supriya_sule) May 4, 2018
भुजबळ साहेबांना जामीन मिळाला याचा मनापासून आनंद आहे. जामीन मिळणं हा भुजबळ साहेबांचा न्याय्य हक्क होता. दुर्दैवाने त्याला उशीर झाला. ते लढवय्ये आहेत पुन्हा संघर्ष करून उभे राहतील. येणाऱ्या काळात त्यांचं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध होईल. मी व पक्ष त्यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहोत.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 4, 2018
काय आहे प्रकरण ?
दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च २०१६ पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी २०१६ पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टाने तसेच मुंबई उच्च न्यायालयानं छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे ४५ (१) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामिनावर मुक्तता करण्याची मागणी भुजबळ यांनी केली होती.
Add Comment