fbpx

धनंजयचा पराभव झाल्यास महाडिक गटाच राजकारण संपणार : महादेवराव महाडिक

kolhapur-MP-Dhananjay-Mahadik

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने खा.धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. मात्र धनंजय महाडिक यांचा पराभवाची चिंता माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केली आहे. या लोकसभेला धनंजय महाडिक यांचा पराभव झाल्यास जिल्ह्यात महाडिक गटाचे राजकारण संपणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

महादेवराव महाडिक हे करवीर येथे कार्यकर्त्यांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी हे भाकीत केले. यावेळी महादेवराव महाडिक म्हणाले की, चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. तसेच लोकसभेत पुतण्याचा पराभव झाला तर कोल्हापूर जिल्हा दूध संघच्या म्हणजेच गोकूळच्या सत्तेला देखील मुकावे लागेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

यावेळी महादेवराव महाडिक यांनी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या गोकूळच्या विशेष सभेमधील वर्तणुकीविषयी संताप व्यक्त केला. चंद्रदीप ज्या पद्धतीने सभेला नाचत आला तसाच त्याचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असाही इशाराही महाडिक यांनी दिला.