साताऱ्यात राजकीय उलथापालथ, शिवेंद्रराजे भाजपात तर मकरंद पाटील बँकेत

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील मतदारसंघामधील खुंटलेल्या विकासाचे कारण पुढे करत भाजपात प्रवेश केला आहे.

मात्र आता सातारा जिल्ह्यात पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीने माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालकपदी मकरंद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शिवेंद्रराजे यांचे खंदे साथीदार मानले जाणारे मकरंद पाटील राष्ट्रवादीतचं राहणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीची सत्ता असलेली व देशात नावलौकिक प्राप्त केलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ निर्माण झाली असून पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी सतर्क झाले आहेत. त्याचाच प्रत्यय म्हणून स्व. लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव मकरंद पाटील यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजपची आज मेगा भरती, ५ आमदारांसह अनेक कार्यकर्त्यांचा झाला पक्षप्रवेश

आम्ही बहुमताचे सर्व विक्रम मोडीत काढणार : देवेंद्र फडणवीस

शिवेंद्रसिंहराजेंनी मागितला उदयनराजे आणि संभाजीराजेंचा पाठींबा