मुलांची तस्‍करी प्रकरणात पोलीस आणखीन मुलांचा शोध घेणार; अटकेतल्या दलालाकडून काढणार माहिती

औरंगाबाद : मुलांची तस्‍करी प्रकरणात पोलिसांनी मुलांची विक्री प्रकरणात दलाली करणारा सुरेश भानुदास लाखोले (५२, रा. एल आयजी, म्हाडा कॉलनी, तीसगाव) याच्‍या कोठडीत वाढ करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी पी.एस. मुळे यांनी दिले.

प्रकरणात संजयनगर मुकुंदवाडीत राहणारे समाजसेवक देवराज नाथाजी वीर (४७) यांनी दिलेल्या फिर्यादवरुन मुकुंदवाडी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. पोलिसांनी २ सप्‍टेंबर रोजी जनाबाई जाधव आणि सविता पगारे यांना अटक केली. पोलीस कोठडीदरम्यान त्‍यांनी दिलेल्या माहितीवरुन नंदा उदावंत नंतर ५ सप्‍टेंबरला सुरेश लाखोले याला अटक केली.

आरोपीने पोलीस कोठडी दरम्यान त्‍या अल्पवयीन मुस्‍लीम मुलाचे आई वडील नेर (जि. जालना) येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्‍यानूसार पोलिस नेर येथे रवाना झाले मात्र त्‍या अल्पवयीन मुलाचे वडील भेटले नाही. पोलिसांनी याबाबत मोजपुर (जि. जालना) येथून पीडित मुलाच्‍या वडीलांची माहिती घेतली असता, तो रेकॉर्ड वरील हिस्‍ट्रीशिटर असल्याचे समोर आले.

आरोपीला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी आरोपीने अशा प्रकारे किती मुलांच्‍या खरेदी-विक्रीचा व्‍यवसाय केला आहे याचा तपास बाकी असल्याने आरोपीच्‍या पोलीस कोठडीत वाढ करण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

महत्वाच्या बातम्या :