भरती प्रक्रियेत सापडलेल्या डिजिटल मुन्ना भाईने डीव्‍हाईस कोठुन आणले याचा तपास पोलीस करणार

औरंगाबाद : पोलीस भरतीत डमी उमेदवार बसवून तोतयागिरी करणार्या महिलेसह तिच्‍या साथीदाराच्‍या जवळ सापडलेल्या डिजिटल वस्तू, आणखीन इतर जिल्ह्यात अशा प्रकारे डमी उमेदवार सामील केल्याचा तपास पोलीस करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुजा रामदास दिवेकर (२४, रा. टिव्‍ही सेंटर, स्‍वामी विवेकानंद नगर) आणि आकाश भाऊलाल राठोड (२२, रा. बेगानाईक तांडा, आडगाव ता. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.

प्रकरणात सातारा पोलीस ठाण्‍याच्‍या अंमलदार भैरवी बागुल (३६) यांनी फिर्याद दिलेल्‍या फिर्यादीनूसार सातारा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यता आला आहे. पोलिसांनी वरील दोघा आरोपींना अटक करुन त्‍यांच्‍याकडून मोबाइलसह मायक्रो माईक स्‍पाय डिव्‍हाईस, ब्ल्‍युटूथ, आधार कार्ड, व एक मोबाइल लपुन ठेवण्‍यासाठी तयार केलेला टिशर्ट असा सुमारे दहा हजारांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला आहे. आरोपींनी पोलीस कोठडी दरम्यान सचिन व रणजित राजपूत या दोघांनी अशा प्रकारे अनेक गुन्‍हे केले असून त्‍यांनी अनेक परिक्षेत डमी विद्यार्थी बसविल्याची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान कोठडीची मुदत संपल्याने दोघा आरोपींना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी गुन्‍ह्याचा मुख्‍य सुत्रधार रणजित राजपुतसह सचिन राजपूत व राजू याला अटक करायची आहे. गुन्‍ह्यात आरोपींचे आणखी कोणी साथीदार असून त्‍यांचा शोध घेवून त्‍यांना देखील अटक करायची आहे. अल्पवयीन मुलीने पंधरा दिवसांपूर्वी क्लर्क पदाची परिक्षा दिलेली आहे त्‍याचा तपास करायाचा आहे. आरोपी आकाशच्‍या जागी परीक्षा देणार्या भागवत ढाकणे याला अटक करायची आहे. आरोपींनी डीव्‍हाईस कोठुन आणले, कोण कोणत्‍या परिक्षांसाठी त्‍याचा उपयोग केला तसेच आरोपींनी कोणत्‍या जिल्ह्यांमध्‍ये डमी विद्यार्थ्‍यांचा उपयोग केला याचा तपास बाकी असल्याने आरोपींच्‍या पोलीस कोठडीत वाढ करण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

महत्वाच्या बातम्या :