राणेंचा २५ सप्टेंबर रोजी पोलीस ऑनलाइन जबाब नोंदवणार

narayan rane

नाशिक: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पोलीस २५ सप्टेंबररोजी ऑनलाइन जबाब नोंदवणार आहे. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत आक्षेपार्ह विधान केले होते. यावरूनच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यावेळी नाशिक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती.

दरम्यान या पार्श्वभूमीवर त्यांना २५ सप्टेंबर रोजी जबाब नोंदवायचा आहे. याबाबतीत नाशिक पोलिसांनी राणे यांच्या वकिलाशी संवाद साधला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा ऑनलाइन जबाब घेणार असल्याचे नाशिक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नारायण राणे यांच्या ‘मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावणार’ या वक्तव्याने राज्यात तीव्र प्रतिसाद उमटले होते. शिवसैनिकांनी आक्रमक रूप त्यावेळी घेतले होते. भाजप-शिवसेना असा वाद त्यावेळी पहावयास मिळाला. दरम्यान या वक्तव्यावरूनच यावरच राणे यांना २५ सप्टेंबररोजी जबाब नोंदवावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या