खबरदार ! योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर ‘सेल्फी’ काढणे आहे अपराध

yogi poster

टीम महाराष्ट्र देशा: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सेल्फी काढण्यास पोलीस प्रशासने बंदी घातली होती. योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाकडे जाणारा कालिदास मार्ग जिथून सुरु होतो तेथेच लावलेल्या एका फाटकावर सेल्फी न काढण्याचा ‘बोर्ड’ लावला होता. मात्र, सोशल मिडीयावर याची उलट चर्चा सुरु झाल्याने तो बोर्ड आता हटवण्यात आला आहे.

“या व्ही.व्ही.आय.पी क्षेत्रात फोटो काढणे तसेच सेल्फी काढणे हा दंडनीय अपराध आहे. अस करताना जर कोणी पकडल गेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल”. अस त्या बोर्डवर लिहिलेल होत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्ही.व्ही.आय.पी कल्चर संपविण्यासाठी पाऊल उचलले आहेत. त्या निर्णयाला छेद देण्याचा योगी आदित्यनाथ प्रयत्न करत असल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागल्याने हा बोर्ड हटवण्यात आला आहे. या बोर्डवर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सुद्धा जोरदार टीका केली होती.